Devendra Fadnavis | ‘चिंता करू नका, भाजप ग्रामपंचायतींच्या निकालात बाजी मारेल’ – देवेंद्र फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आज (दि. 20) निकाल जाहीर होणार आहे. रविवारी या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकांची आज मतमोजणी होत असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निकाल यावेळी जाहीर होईल. या निवडणुकांत जनतेतून थेट सरपंच निवडून दिला जाणार आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षच बाजी मारणार असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. नागपुरात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते.

नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना भाजपचा विजय होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्यक्त केला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाला सांगतो, लिहून घ्या, महाराष्ट्रात पुन्हा नंबर एक भारतीय जनता पक्षच असेल. आपल्याला बहुमत मिळेल. कोणी काहीही काळजी करु नका. पुन्हा एकदा जनता आपल्या पाठिशी उभी राहणार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच निवडीसाठी
रविवारी मतदान पार पडले होते. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील आहेत.
विदर्भात एकूण 2276 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले असून,
आज कोण बाजी मारणार याबद्दल गावागावांत उत्सुकता आहे.
विदर्भाबरोबरच सिंधुदुर्ग 293, कोल्हापूर 431, सोलापूर 1418, नागपूर 236, नाशिक 196 अहमदनगर 1965 आणि बीड 670 ग्रामपंचायतींचा निकालही मंगळवारी जाहीर होत आहे.

Web Title :- Devendra Fadnavis | gram panchayat election 2022 results devendra fadnavis says bjp will be number one party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | दारुसाठी पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने हल्ला करुन खून

Pune Crime | ‘‘तू पाकिस्तानी आहे, तुमचे व्हिडिओ कसे व्हायरल करते बघ’’; महिलेने नस कापण्याची भिती दाखवून दिली धमकी

Desi Ghee | या ३ प्रकारच्या लोकांनी खाऊ नये देशी तूप, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान