Accident in Beed | कार अन् खाजगी बसच्या धडकेत ग्रामसेवक जागीच ठार, बीड जिल्ह्यातील घटना

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  भरधाव कार आणि ट्रॅव्हलच्या ( Car and travel) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत (accident) ग्रामसेवकाचा (Gramsevak) जागीच मृत्यू झाला आहे. बीड-परळी महामार्गावर (Beed-Parli highway) वडवणीजवळ (Vadvani) बुधवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident in Beed) झाला. अपघातात (Accident in Beed) कारचा चुराडा झालेला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

राजेंद्र श्रीरंग मुंडे (वय 41) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे.

वडवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राजेंद्र मुंडे हे वडवणी तालुक्यातील मौजे देवडी येथील रहिवाशी होते.
ते परभणी जिल्ह्यातील केसापुरी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत होते.
मुंडे बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास कारने ( एमएच-02- सीएफ 5226) बीडकडे जात होते.
त्यावेळी बीडकडून येणारी खाजगी बस (एमएच-29 व्ही 7227) आणि मुंडे यांच्या कारची वडवणीजवळ समोरासमोर धडक झाली.
यात ग्रामसेवक मुंडे हे जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच वडवणी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, आसेफ शेख, अशोक आघावसह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामसेवक मुंडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक खुली केली.
वडवणी पोलीस तपास करत आहेत.

 

Web Title : gramsevak killed spot speedy travel and car accident in beed district

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत