गृहिणींना मोठा दिलासा ! 1 एप्रिलपासून घरगुती LPG गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी होणार ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्यास दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइन लिमिटेडने बुधवारी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती 10 रूपयांनी प्रति सिलेंडर कमी केली आहे. नवीन किंमती 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे.

आता सध्या नवी दिल्लीमध्ये विनाअनुदानित गॅस सिलेंडर 819 रूपये, कोलकत्तामध्ये 845.50 रूपये, मुंबईत 819 तर चेन्नईमध्ये 835 रूपयांना मिळत होता. सिलेंडरच्या किंमती 1 एप्रिलपासून कमी झाल्यानंतर आता दिल्लीमध्ये एका एलपीजी सिलेंडरची किंमत 809 रूपये, कोलकत्तामध्ये 835.50 रूपये, मुंबईत 809 तर चेन्नईमध्ये 825 रूपये होणार आहे.