वितळतोय ‘बर्फाचा पर्वत’, संपुर्ण जगात विध्वंसाची शक्यता; बुडून जातील बांगलादेश अन् मालदीव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  या संपूर्ण प्लॅनेटवर दुसरा सर्वात जास्त बर्फ ग्रीनलँडच्या पोटात ठेवलेला आहे आणि ग्रीनलँडच्या बर्फाबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. ताज्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ग्रीनलँडचा बर्फ आता इतक्या वेगाने पसरत आहे, जेथून आता परतणे शक्य होणार नाही. कोपेनहेगन युनिव्हर्सिटीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ग्रीनलँड बर्फ जेवढ्या वेगाने वितळत आहे त्यामुळे समुद्रातील पाण्याची लेव्हल 23 फुटापेक्षा जास्त वाढेल, जी या जगाचा विध्वंस करण्यासाठी पुरेशी असेल.

ग्रीनलँडमधील बर्फाबाबत कोपेनहेगन युनिव्हर्सिटी आणि आर्कटिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वेने संयुक्त प्रकारे संशोधन केले आहे, ज्यामध्ये अतिशय चिंताजनक खुलासा केला आहे आणि रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जो विनाश बर्फ वितळल्याने होईल, त्याच्या समोर कोरोना व्हायरस काहीही नाही. हा रिसर्च सेन्ट्रल वेस्टर्न पार्टमध्ये करण्यात आला, जो या पृथ्वीवरील टॉप-5 ग्रीनलँडपैकी एक आहे.

वेगाने वितळतोय ग्रीनलँडचा बर्फ

कोपेनहेगन युनिव्हर्सिटी आणि आर्कटिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वेच्या संशोधकांनी इशारा जारी करताना म्हटले की, जर ग्रीनलँडच्या बर्फाचा थर पूर्णपणे वितळला तर जगात विध्वंस पसरण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. बर्फाचा थर इतक्या वेगाने वितळत आहे की, येत्या काळात समुद्राची पातळी 7 मीटरपेक्षा जास्त वाढेल, ज्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये जीवघेणा पूर येईल.

या संशोधनात म्हटले आहे की, ग्रीनलँडमध्ये बर्फाचा थर वितळल्याने महासागरांचे प्रवाह, पावसाळी भाग, वर्षावनावर खुप भयंकर परिणाम होईल. मात्र, रिपोर्टमध्ये अजूनपर्यंत हा खुलासा झालेला नाही की, बर्फाचा थर वितळण्याचे सत्र आपल्या पॉईंटपर्यंत पोहचले आहे किंवा पोहचणार आहे, परंतु रिपोर्टमध्ये आवश्यक सांगितले आहे की, काही वर्षात समुद्राची लेव्हल काही मीटर आवश्य वाढेल, जे अतिशय धोकादायक ठरू शकते.

पृथ्वीवर अस्थितरता सुरू

या रिसर्चमध्ये सहभागी शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, ग्रीनलँडमध्ये बर्फ वितळण्याचा परिणाम पृथ्वीवर दिसू लागला आहे आणि अस्थिरतेचे चित्र दिसू लागले आहे. ग्रीनलँडमध्ये खुप वेगाने बर्फाच्या वितळण्याचे सत्र जारी आहे. या रिसर्चचे नेतृत्व करणारे डॉ. निकल्स बोर्स यांनी म्हटले ग्रीनलँडमध्ये वेगाने बर्फ वितळणे भयंकर आहे. आताही आमच्याकडे एका भागाचा रिपोर्ट आहे आणि रिसर्च आहे, तर धोका यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

संशोधकांना सेंट्रल-वेस्टर्न ग्रीनलँडच्या बर्फाच्या थराचा जॅकबशवन ड्रेनेज बेसिनच्या आकड्यांवरून समजले आहे की, बर्फाच्या थराचा एक भाग नष्ट होण्याच्या टोकावर पोहचला आहे. जॅकबशवन ड्रेनेज बेसिनद्वारे बर्फाचा थर किंवा ग्लेशियरसंबंधीत आकड्यांना एकत्रित केले जाते. या अतंर्गत मागील 140 वर्षांपासून आर्कटिक, ग्रीनलँड, हिमालयातील बर्फाच्या थराच्या वितळण्याचा दर आणि बर्फाच्या थराच्या उंचीबाबत अभ्यास केला जातो आणि नोंद ठेवली जाते.

भारत, बांगलादेश, फ्लोरिडा, धोक्याच्या टॉप लिस्टमध्ये

रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर 2300 इ.स. पर्यंत समुद्राची पातळी 1.2 मीटर वाढेल ती सुद्धा तेव्हा, जेव्हा 2015 पॅरिस क्लायमेट गोल प्राप्त केला जाईल आणि ज्या वेगाने बर्फ वितळत आहे, त्यामुळे जगातील अनेक मोठ-मोठी शहरे धोक्यात आहेत. रिपोर्टनुसार शांघायपासून लंडनपर्यंत प्रत्येक शहर धोक्यात असेल. रिपोर्टनुसार फ्लोरिडा, भारत आणि बांगलादेश सुद्धा धोक्याच्या टॉप लिस्टमध्ये आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर समुद्रात पाण्याची पातळी 2 मीटरपर्यंत वाढली तर बांगलादेश आणि मालदीवसारखे देश पूर्णपणे नष्टच होतील.