GST चा अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा ! जानेवारीत जमला तब्बल 1 लाख 20 हजार कोटींचा GST

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था डगमळीत झाली असताना व सर्वच क्षेत्रांना अर्थमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अशा वेळी त्यांना एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

जानेवारी महिन्यात जीएसटी कराद्वारे केंद्र सरकारला तब्बल १ लाख २० हजार कोटी रुपये गोळा झाला आहे. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख १९ हजार ८७४७ कोटी रुपये इतका जीएसटी सरकारी तिजोरीत गोळा झाला आहे. गेल्या महिन्यात १ लाख १५ हजार कोटी रुपये इतका जीएसटी गोळा झाला आहे़ गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १० हजार कोटी रुपयांचा अधिक महसुल गोळा झाला आहे.

सीजीएसटी २१ हजार ९२३ कोटी रुपये, तर एसजीएसटी २९ हजार १४ कोटी आणि आयजीएसटी ६० हजार २८८ कोटी रुपये जमा झाला आहे. हे पाहता अर्थ व्यवस्था पूर्णपणे रुळावर आल्याचे दृश्य आहे.