GST Council Meeting : आता चहा-कॉफी झाली ‘महाग’, हॉटेलमध्ये राहिल्यास फक्त एवढा ‘जीएसटी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जीएसटी कौन्सिलच्या 37 व्या बैठकीच्या आधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बूस्टर डोज दिला आहे. यानंतर जीएसटी कौन्सिलने कॅफिनेटेड ड्रिंक्सवरील GST दर वाढले आहेत. यानंतर या ड्रिंक्सवर 18 टक्क्यांवरुन 28 टक्के जीएसटी वाढवण्यात आला आहे. याशिवाय कॅफिनेटेड ड्रिंक्सवर 12 टक्के सेस देखील लागतो.

काय आहे कॅफिनेटेड ड्रिंक –
या ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असते. शक्यतो कॉफी आणि चहा सह अनेक एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिन असतो. कॅफिन आपल्या मेंदू आणि नर्वस सिस्टिमवर परिणाम करतो.

हॉटेलमध्ये राहणे होऊ शकते स्वस्त –
गोव्यात झालेल्या या बैठकीत हॉटेल टॅरिफ वर टॅक्स कपात करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. या निर्णयानंतर 7500 रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेल्या रुमवर 18 टक्के जीएसटी लागेल. तर 7,500 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या रुमवर हा टॅक्स 12 टक्के असेल.

जीएसटीच्या दरात कपातीची मागणी –
या बैठकीत ऑटोमोबाइल क्षेत्रापासून FMCG सेक्टरपर्यंत GST दरात कपात करण्याची शक्यता आहे. आर्थिक सुस्तीमुळे मागणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ही मागणी केली जात आहे.

दरात कपातीने महसूलात घट होण्याची भीती –
जीेएसटी कौन्सिलच्या फिटमेंट कमेटीने 200 वस्तूवरील जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय फेटाळला आहे. याने महसूलात कमी येईल असे कमिटीकडून सांगण्यात आले. त्यामुळे जीएसटी दर कपातीला विरोध होत आहे.

Visit – policenama.com 

You might also like