GST Council Meet | एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल जीएसटीच्या कक्षेत येणार नाही; राज्यांना अधिकार

नवी दिल्ली : GST Council Meet | एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल म्हणजेच ENA ला जीएसटीच्या कक्षेत आणले जाणार नाही. त्याच्या विक्रीवर कर आकारण्याचे अधिकार परिषदेने राज्यांना दिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी पत्रकार परिषदेत दिली. सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या ५२ व्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. (GST Council Meet)

एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल हा दारू बनविण्याचा कच्चा माल आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, १०१ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना ईएनएच्या विक्रीवर कर लावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नियमांनुसार, जीएसटी परिषदेला ईएनएवर कर लावण्याचा अधिकार आहे. (GST Council Meet)

मात्र, जीएसटी परिषदेने ईएनएवर कर लावण्याचा निर्णय राज्यांवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांनी त्यावर कर लावावा, अथवा लावू नये. हा निर्णय जीएसटी परिषदेअंतर्गत येणार नाही. ऊसापासून बनवलेल्या आणि मद्यासाठी कच्चा माल म्हणून वापरल्या जाणार्‍या मोलॅसिसवरील कराचा दर १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात येणार आहे.

आजच्या जीएसटी परिषदेत आणखी आणखी एक निर्णय घेण्यात आला तो म्हणजे, जीएसटी अध्यक्षांची वयोमर्यादा ६७
वरून ७० वर्षे करण्यात आली आहे. तसेच, जीएसटी परिषदेचे सदस्य पूर्वीच्या ६५ ऐवजी ६७ वर्षे वयापर्यंत सेवा करू शकतात.
अध्यक्ष आणि सदस्य दोघांसाठीही किमान वय ५० वर्षे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?, 2024 च्या लोकसभेसाठी मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?

Maharashtra Vidhan Sabha Elections | पुण्यात विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी ! निष्ठावंत पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि संजय भोसले यांच्यावर जबाबदारी