Gudi Padwa Celebration 2022 | ‘या’ दिवशी साजरा होणार गुढीपाडवा; नववर्षाची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gudi Padwa Celebration 2022 | गुढीपाडवा हा एक भारतीय सण (Gudi Padwa Celebration 2022) असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात (Maharashtra) साजरा केला जातो. तर, आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) व कर्नाटक (Karnataka) मध्ये याच दिवशी उगादी नावाने सण साजरा केला जातो. तसेच नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अत्यंत आनंदाने दक्षिण भारतीय नागरिक हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.

 

शालिवाहन राजाने शालिवाहन शकास प्रारंभ केला. तसेच या शकाची सुरूवात अर्थात गुढीपाडवा आहे. खरंतर शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालीवाहन राजाचे महत्त्व आहे. यादिवशी काही ठिकाणी शोभायात्रा काढून, पंचागाचे वाचन करून अथवा सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर गुढीपाडवा सण साजरा करण्याची आणखी एक कारण महाभारताशी संबंधित सांगितले जात आहे. दरम्यान, महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. तो दिवस नववर्ष होय. याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करतात असं म्हटलं जातं. (Gudi Padwa Celebration 2022)

अशी सजवतात गुढी?
महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी गुढी सजवण्याची पद्धत वेगळी असते. मात्र खरंतर सर्व भागांतील गुढीमध्ये गुढीला गुंडाळलेली साडी ही एक समान पद्धत दिसून येते. नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका उंच काठीला रेशमी साडी घेऊन तिची घडी बांधली जातेय. नंतर त्या काठीवर चांदीचा अथवा इतर धातूचा तांब्या उपडा करून ठेवला जातोय. आंब्याची पाने व कडूनिंबाची डळाळी बांधून गुढी जादा सुंदर सजवली जातेय. तसेच, गुढीला फुलांचा हार आणि गाठीची माळ चढवली जातेय. त्याचबरोबर अलिकडे राज्यातील काही भागामध्ये गुढीला साडी न बांधता हिंदू धर्माचे प्रतिक असलेला भगवा झेंडा बांधला जातो.

 

पूजा करण्याची परंपरा –
खरंतर सूर्योदयापूर्वी गुढी उभारली जातेय, या शुभ दिवशी पहाटे लवकर उठून तेलाने स्नान करण्याची परंपरा आहे.
त्याचबरोबर घरातील सर्व देव-देवतांचे पूजन झाल्यानंतर घरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दरवाजाला फुलांनी सजवले जातेय.
दाराबाहेर रांगोळी काढून दिवे लावावेत. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी.
गावाकडील भागामध्ये त्या जागेला गायीच्या शेणाने सारवले जाते. प्रामुख्याने गुढी पाटावर उभी केली जातेय.
नंतर गुढी उतरवताना सायंकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी गुढी उतरवली जातेय.

 

Web Title :- Gudi Padwa Celebration 2022 | gudi padwa 2022 this year gudi padwa is on 2nd april

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी ! DA मध्ये भरघोस वाढ, कॅबिनेटमध्ये झाली घोषणा

 

How To Control Blood Sugar | ब्लड शुगर लेव्हल करायची असेल कंट्रोल तर ‘या’ Fruits चे करा सेवन; जाणून घ्या

 

Urvashi Rautela Superhot Photo | उर्वशी रौतेलानं डीप नेकचा ड्रेस घालून चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हायरल फोटो