अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये राईड तुटून तीन ठार, १५ हून अधिक जखमी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमधील कांकरिया अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये एक राईड तुटून झालेल्या भीषण अपघातात ३ ठार तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, हा अपघात राईडचा पाळणा तुटून झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासनाने मदत कार्य़ सुरु केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उडाला असून प्रशासनाकडून जखमींना धीर देण्यात येत आहे.

आज रविवार असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन या अ‍ॅडव्हेंचर पार्कमध्ये आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आज सायंकाळी राईड सुरु असताना पाळणा वेगात खाली आणि एका बाजूला कलंडला. त्यात बसलेल्या लोकांना जोरात हिसका बसला. यात तीन ठार झाले तर १५ जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या