एकट्या बडोद्यात पतंगाच्या मांज्याने तब्बल 250 पक्षी जखमी

बडोदा : गुजरातमध्ये (Gujarat) मकर संक्रातीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. सर्व शहरे, गावांमध्ये गच्चीवर जाऊन पंतग उडविला जातो. मात्र, या पंतगबाजीमुळे पक्षींसमोर मोठे संकट येते. पतंगाचा मांजा पायात अडकल्याने शेकडो पक्षी जखमी होतात. त्यात काहींचा तडफडून मृत्युही होतो. एकट्या बडोदा शहरात पतंगबाजीमुळे अडीचशेहून अधिक पक्षी जखमी झाल्याचे आढळून आले आहे.

बडोदा वन विभागाने उत्तरायण उत्सवानिमित्त जखमी झालेल्या पक्ष्यांच्या प्रथमोपचाराची सुविधा सुरु केली आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर निधी दवे यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत २४५ पक्ष्यांची सुटका केली आहे.

 

 

 

 

बडोदा शहराप्रमाणेच सुरत, अहमदाबाद शहरात पतंगबाजीत शेकडो पक्षी जखमी झाले आहेत. गुजरातमधील विविध शहरात स्वयंसेवी संस्थांनी मांजा पायात अडकून जखमी झालेल्या पक्ष्यांवर प्रथमोपचार करण्याची सुविधा उभारली होती़. शेकडो पक्ष्यांवर उपचार करुन त्यानंतर त्यांना पुन्हा आकाशात सोडून देण्यात आले.

गुजरातप्रमाणे राजस्थानामध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जयपूरमध्ये होप अँड बियॉड या स्वयंसेवी संस्थेने ३५० जखमी पक्ष्यांवर उपचार केले आहेत.