नुकत्याच जन्मलेल्या जुळ्या मुलांना ‘कोरोना’ची लागण

बडोदा : येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलेल्या जुळ्या मुलांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बडोदातील एस एस जी रुग्णालयातील बाल रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अय्यर यांनी सांगितले की, जुलाब, अतिसार आणि निर्जलीकरणामुळे आजारी असलेल्या १५ दिवसांच्या जुळ्या मुलांना रुग्णालयात आणले आहे. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. अद्यापही त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लहान मुलांना लागण होण्याचा धोका वाढला आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे.