धक्‍कादायक ! रिक्षा घेण्यासाठी ४० हजार मिळाले नाहीत म्हणून पतीने दिला ३ तलाक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका बाजूला संसदेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा आणि विरोध सुरु असताना दुसऱ्या बाजूला देशात तलाकची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक घटना गुजरातमध्ये समोर आली आहे. येथे पतीने पत्नीकड़े माहेरून ४० हजार रुपये आणण्याची मागणी केली. मात्र तिने यासाठी नकार दिल्यानंतर त्याने तीन वेळा तलाक म्हणत तिला घटस्फोट दिला.

गुजरातच्या सुरतमधील हे प्रकरण असून येथील एका २३ वर्षीय महिलेने आरोप करताना म्हटले आहे कि, त्याने सायकल रिक्षा खरेदी करण्यासाठी माहेराहून ४० हजार रुपये आणण्याची मागणी केली. मात्र माझ्या आई वडिलांनी ते न दिल्याने त्याने मला तलाक दिला. यावेळी बोलताना तिने म्हटलं कि, यासाठी त्याला शिक्षा व्हायला हवी. मला न्याय मिळायला हवा. या प्रकरणाविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले कि, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. तीन तालाकच्या या मुद्द्यावर संसदेत मोठ्या प्रमाणावर लढाई होत असताना सामान्य महिलांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काल लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले असून आज राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, काल लोकसभेत या विधेयकावर चर्चेवेळी काँग्रेस डीएमके आणि राष्ट्रवादी सहित अनेक पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. त्याचबरोबर भाजपचा मित्रपक्ष जेडीयू या चर्चेत सहभागीच झाला नाही. त्यामुळे आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर होते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –