कौतुकास्पद ! ‘या’ महिला न्यायाधीशाने अनेक निर्णय घेतले, ‘या’ निर्णयानं मात्र होतय सर्वत्र ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील आणंद जिल्ह्यातून एक अतिशय कौतुकास्पद घटना समोर आली असून येथील एका महिला न्यायाधीश आणि पती जिल्हा विकास अधिकाऱ्याने एका मुलीला दत्तक घेतले. या मुलीच्या आईचा तिच्या जन्मावेळी मृत्यू झाला. त्यानंतर या मुलीच्या पालनपोषणाची चिंता असणाऱ्या पित्याला दिलासा देत या अधिकाऱ्याने या मुलीला दत्तक घेतले. यामध्ये त्यांच्या पत्नीचा देखील त्यांना पाठिंबा मिळाला.

अशी आहे घटना

३ ऑगस्ट रोजी एका दवाखान्याला भेट देण्याकरिता गेले असताना तेथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे महिलेचा पती दुखी झाला होता. त्यावेळी हि घटना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या पत्नीला फोन केला. त्यानंतर त्यांनी पूर्ण हकीगत आपल्या पत्नीला सांगितली आणि मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुलीचा जन्म माही नदीच्या जवळ झाल्याने त्यांनी मुलीचे नाव माही ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुलीच्या वडिलांनी देखील त्यांच्या या निर्णयाला होकार दर्शविल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब खुश असून या मुलीच्या येण्याने त्यांच्या कुटुंबात आनंद पसरला आहे. या दाम्पत्याला एक दीड वर्षाचा मुलगा देखील असून या मुलीच्या येण्याने आमचे कुटुंब पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ssss_081819065627.jpg

दरम्यान, अशा काही घटनांमधून आजही जगात माणुसकी शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जाती आणि धर्मावर भांडणे करणाऱ्या लोकांसाठी हा फार मोठा धडा असून यातून नागरिकांनी बोध घ्यावा.

आरोग्यविषयक वृत्त-

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like