अभिनेत्री गुल पनागने शेअर केला व्हॅकेशनमधील हॉट ‘अवतार’ !

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री गुल पनाग नुकतीच मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करून घरू परतली आहे. गुल पनागने 20 वर्षांपूर्वी त्याच ठिकाणीवरील आपला सुंदर फोटो शेअर केला आहे. सध्या चाहत्यांकडून हा फोटो पसंत केला जात आहे. गुलने 1999 मधील शेअर केलेल्या तिच्या या फोटोत तिने जो स्विम सूट घातल्याचे दिसत आहे तोच तिने नुकताच सुट्ट्यांचा आनंद घेताना घातला होता.

गुलने 1999 चा आणि आताचा फोटो एकत्र करून शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये गुल म्हणते, “20 वर्षांनंतर मालदीवमध्ये वापसी.” गुलची तेव्हाची पोज आणि आताची पोजही सेम आहे.

गुलच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिंच कौतुक केलं आहे. इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनीही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

वीजे मारिया गोरेट्टीने कमेंट केली आहे, “शानदार, खूपच सुंदर.”

अभिनेत्री आयुष्मान खुरानानेही हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. अभिनेत्री रसिका दुग्गलनेही तिचं कौतुक केलं आहे.

एक युजर तर म्हणतो, “तुमचं वय तेव्हापासून वाढलंच नाही.”

गुलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकतीच ती अ‍ॅमेझॉन प्राईमच्या द फॅमिली मॅन या वेब सिरीजमध्ये दिसली होती.

Visit : Policenama.com