आपना टाइम आएगा…! गलीबॉय चा ”यो” ट्रेलर रिलीज   

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता रणवीर सिंग याच्या सिम्बा च्या यशानंतर आता रणवीर सिंगचा नवा चित्रपट ‘गली बॉय’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘गली बॉय’ च्या टिझर ला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ट्रेलरला देखील मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाता रणवीरचा हिपहॉप अंदाज पाहायला मिळतो आहे. रॅप वर्ल्ड मध्ये खळबळ माजवायला रणवीर सिंग सज्ज झाला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीर आणि आलियाच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळते.
रणवीर -आलियाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर
‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटासाठी रणवीरने रॅपचे प्रशिक्षण घेतले आहे. रणवीर सिंगने आतापर्यंत केलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला असून या भूमिकेला देखील तो न्याय देईल, असे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. रणवीर सिंगचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना भावतो का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
रॅप कसं करतात इथपासून सुरुवात होऊन पुढचा प्रवास करत जागतिक स्तरावर आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या रॅपरच्या स्वप्नांना या चित्रपटाच्या निमित्ताने नवी झेप मिळाली आहे असं म्हणावं लागेल. मुंबईमध्ये कलाकारांचा एक असा वर्ग आहे, ज्या वर्गाची कला अनेकदा दुर्लक्षित राहते, पण गेल्या काही वर्षांमध्ये याच कलेला मिळणारा प्रतिसाद पाहता रॅप प्रकारातील गाण्यांची दुनिया नेमकी आहे तरी कशी हे ‘गली बॉय’मधून पाहता येणार आहे.