Hair Fall पासून होईल सुटका, केस होतील काळे आणि दाट, ‘या’ तेलाने करा मालिश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्ही केस गळण्याने (Hair Fall) त्रस्त असाल किंवा केस लांब (Long Hair) करायचे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मोहरीचे तेल (Mustard Oil) या समस्यांपासून मुक्ती मिळवून देऊ शकते, कारण मोहरीचे तेल फक्त स्वयंपाकातच वापरले जात नाही तर ते केस काळे, घट्ट आणि सुंदर (Hair Black, Thick And Beautiful) बनवण्यासाठीही वापरले जाते. औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) समृद्ध मोहरीचे तेल निर्जीव आणि पातळ केसांसाठी सर्वात उपयुक्त आहे (Hair Fall).

 

मोहरीच्या तेलात आढळणारे पोषक घटक (Nutrients Found In Mustard Oil)
मोहरीच्या तेलातील (Mustard Oil) आयर्न (Iron), व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन डी (Vitamin D), व्हिटॅमिन ई (Vitamin E) आणि व्हिटॅमिन के (Vitamin K), मॅग्नेशियम (Magnesium) यांसारखे पोषक घटक केसांचे पोषण करतात.

 

केसांसाठी मोहरीचे तेल का आणि कसे आहे खास (Why And How Mustard Oil Is Special For Hair)
तज्ज्ञांचे म्हणणात की, मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्याने केसगळती कमी होते. केस गळणे (Hair Fall) आणि निर्जीव केस होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डोक्याच्या त्वचेतील रक्ताभिसरण (Blood Circulation) बिघडणे. अशा वेळी मोहरीचे तेल लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. हे तेल वापरण्याची पद्धत आणि जबरदस्त फायदे जाणून घेऊया (Let’s Know How To Use This Oil And Its Benefits)…

अशा प्रकारे वापरा मोहरीचे तेल (Use Mustard Oil This Way)

1. शॅम्पू करण्यापूर्वी हातावर थोडेसे मोहरीचे तेल घेऊन तळहातांवर चोळा.

2. आता केसांच्या मुळापर्यंत कोमट तेल लावा.

3. काही वेळ केसांना तेलाने मसाज करा.

4. एक तासानंतर केसांना शॅम्पू (Shampoo) करा.

5. मोहरीचे तेल केस मऊ आणि मजबूत (Hair Soft And Strong) बनवते.

 

मोहरीच्या तेलाने केसांना होणारे आश्चर्यकारक फायदे (Amazing Benefits Of Mustard Oil On Hair)

1. हे तेल नैसर्गिक कंडिशनर आहे, ज्यामुळे केस दाट आणि निरोगी होतात.

2. या तेलाने केसांना मसाज केल्याने केस मऊ, रेशमी आणि दाट होतात.

3. मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्याने कोंडा (Dandruff) दूर होतो.

4. यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म (Anti-bacterial And Antifungal Properties) असल्याने बॅक्टेरिया आणि बुरशीपासून स्कॅल्पचे संरक्षण होते.

5. मोहरीच्या तेलात असलेले ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, बीटा-कॅरोटीन, सेलेनियम (Omega-3 Fatty Acid, Beta-Carotene, Selenium) केसांची वाढ वाढवतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Fall | Mustard Oil For Hair mustard oil is most beneficial oil for hair growth thickness shiny hair white hair and hair fall know its another benefits too

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Patients Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ‘ब्लड शुगर’

 

Nana Patole On Adv Satish Uke Arrest | सतीश उकेंना ED ने अटक करताच नाना पटोलेंची सावध भूमिका; म्हणाले…

 

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’