‘लॉकडाऊन’मध्ये गरजवंतासाठी ‘देवदूत’ बनले हाजी आबिद सय्यद, 2 महिन्यांपासून 2000 लोकांना देताहेत जेवण ! ईदच्या निमित्तानं वाटलं 10,000 लिटर दूध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यासह देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशात अनेक मुजर आणि गरीबांचे खाण्याचे हाल होत आहेत. या सगळ्यात पुणे शहरातील कोंढवा परिसरातील हाजी आबिद सय्यद देवदूतासारखे लोकांना मदत करत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून ते जवळपास 2000 लोकांना मोफत जेवण देत आहेत.

हाजी आबिद सय्यद यांनी सांगितलं की, देवानं आपल्याला काही दिलं आहे यातून आपण गरजूंना मदत करू शकतो. इस्लाम धर्मात झकातला खास महत्त्व आहे ज्यात गरजूंची मदत करणं प्रत्येक मुसलमानाचा धर्म आहे. आबिद यांनी ईदच्या पवित्र निमित्तानं 2000 लोकांना 10,000 लीटर दूध, सुकामेवा, फळं, इत्यादी वाटप करून त्यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की, सण कोणताही असो तो सर्वांच्या घरात साजरा केला जावा तोच खरा सण असतो. या सेवाभावनेतून ते अनेक वर्षांपासून ईद, बकरी ईद किंवा मग अशा अनेक निमित्तानं गरजूंना लक्षात ठेवत असतात आणि त्यांना मदत करत असतात. या कामासठी आबिद यांना पोलीस प्रशासनाचीही खूप मदत झाली आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचेही आभार मानले आहेत.

आबिद म्हणाले, “आज पूर्ण देश ईद साजरी करत आहे. परंतु यावेळची ईद वेगळी आहे. कारण यावेळी आपल्यात कोरोना व्हायरस आहे. लोक घरात राहूनच, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत ईद साजरी करत नमाज पठन करत आहेत. सर्वांना ईद मुबारक”