Hallmarking | आता वडिलोपार्जित दागिन्यांवरही असेल शुद्धतेचा शिक्का, जाणून घ्या किती आहे जुन्या सोन्याचे हॉलमार्किंग शुल्क

कानपूर : वृत्तसंस्था – Hallmarking | आता घरात ठेवलेल्या वडिलोपार्जित दागिन्यांची (old ornaments) शुद्धताही तपासता येणार आहे. वडिलोपार्जित दागिन्यांना शुद्धतेच्या आधारे, हॉलमार्क प्रमाणपत्र (hallmark certificate) दिले जाईल, ज्याचा अहवाल ज्वेलर्स, बँकर्स आणि गोल्ड लोन कंपन्यांना (jewelers, bankers and gold loan companies) स्वीकारावा लागेल. (Hallmarking)

या संदर्भात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सच्या हॉलमार्किंग विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ इंद्रजित सिंग (Indrajith Singh, a senior scientist, hallmarking department, Bureau of Indian Standards) यांनी सूचना जारी केल्या आहेत. देशातील 256 शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केल्यानंतर BIS चा हा निर्णय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.

आत्तापर्यंत ग्राहकांना ज्वेलर्सकडून खरेदी केलेले सोने तपासून मिळू शकत होते. याद्वारे ज्वेलर्सच्या दाव्याची सत्यता तपासता येईल. मात्र आता घरात ठेवलेल्या जुन्या सोन्याचे हॉलमार्किंग कोणालाही मिळू शकते. अशा सोन्याची हॉलमार्किंग केंद्रांद्वारे चाचणी केली जाईल आणि स्त्रोत विचारला जाणार नाही.

जुन्या सोन्याचे किमान हॉलमार्किंग शुल्क 236 रुपये निश्चित करण्यात आले आहे. या किमतीत दागिन्यांच्या एका नगापासून सहा नगांपर्यंत हॉलमार्किंग करता येते.

नवीन निर्देशांचे फायदे
सध्या जुने सोने विकून मिळणारा भाव सराफा व्यापार्‍यांवर अवलंबून आहे. सोन्याची शुद्धता सराफा व्यापारी स्वत: तपासतात आणि त्या आधारे ते किंमत ठरवतात. आता सराफा व्यावसायिकांना जुने सोने विकून ग्राहकांची फसवणूक करता येणार नाही. कारण ग्राहकांकडे त्या सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आणि हॉलमार्क असेल. म्हणजेच त्यांना त्यांच्या दागिन्यांची योग्य किंमत मिळेल. (Hallmarking)

बँका आणि सोने तारण कर्ज कंपन्या देखील ’इखड’ शुद्धता प्रमाणपत्राला मान्यता देतील. सोने गहाण ठेवताना त्याची शुद्धता ठरवणे त्यांच्या हातात होते. यासोबतच वडिलोपार्जित सोन्याचे दागिने वितळवून त्याची चाचणी करण्यात येत होती. आता याशिवाय कर्ज उपलब्ध होईल.

नुकसान
या नियमाच्या आडून मोदी सरकारने एका बाणात अनेक निशाण्यांवर नेम साधला आहे.
कारण हॉलमार्किंगच्या बहाण्याने लॉकरमधून जुने सोने बाहेर येईल. हॉलमार्किंग केल्यानंतर, ते देखरेखीखाली येईल आणि घोषित स्थावर मालमत्ता म्हणून मानले जाईल.
अशाप्रकारे अघोषित सोने बाहेर काढण्यासाठी हा शिक्का खूप उपयोगी ठरणार आहे.

ग्राहक ही माहिती फॉर्ममध्ये देईल
जुन्या सोन्याचे शुद्धता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्राहकाला त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर, दागिन्यांचा तपशील आणि त्याचे छायाचित्र द्यावे लागेल.
तसेच दागिन्यांचे वजन व संख्या नमूद करावी लागेल.

हॉलमार्किंग केंद्र ग्राहकांकडून सोन्याचे दागिने किंवा कलाकृती तपासण्यास सक्षम असेल आणि पडताळणीनंतर एक परीक्षण अहवाल जारी करेल,
असे भारतीय मानक ब्युरोचे शास्त्रज्ञ इंद्रजीत सिंग यांनी म्हटले आहे.

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे अध्यक्ष पंकज अरोरा म्हणतात की,
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सचा नवीन आदेश लोकांसाठी फायदेशीर आहे.
आतापर्यंत हा आदेश ज्वेलर्ससाठी अनिवार्य होता. आता ग्राहक त्यांच्याकडील जुन्या सोन्यावर शुद्धतेचा शिक्का देखील मिळवू शकतो.

 

 

Web Title :- Hallmarking | how much is the hallmarking fee of old gold now ancestral jewelry will also have a stamp of purity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Card द्वारे घरबसल्या ऑनलाइन करू शकता KYC, जाणून घ्या काय आहे पद्धत

 

Multibagger Penny Stocks | 2021 मध्ये सर्वात जास्त रिटर्न देणारा शेयर बनला ISGEC ! 1 लाख रुपयांचे बनवले जवळपास 4 कोटी

 

Earn Money | बिस्किटचा व्यवसाय करा आणि अल्पावधीतच व्हा लखपती, ताबडतोब जाणून घ्या सोपी पद्धत