‘हमास’चा इस्त्रायलवर रॉकेट हल्ला, सुमारे 300 रॉकेट सोडली, भारतीय महिलेचा मृत्यू; लॉड शहरात इमर्जन्सी लागू

गाझा : वृत्त संस्था – इस्त्रायल आणि हमासमध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेला तणाव आता हिंसक झाला आहे. रात्रीत दोन्ही बाजूंकडून झालेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. ताज्या अपडेटनुसार, हमासने सुद्धा इस्त्रायलवर सुमारे 100 रॉकेट सोडली, ज्यामध्ये एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. युद्धात आतापर्यंत 35 पॅलेस्टाईन आणि 3 इस्त्रायली मारले गेले आहेत.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सोमवारी रात्रीपासून आतापर्यंत 300 पेक्षा जास्त रॉकेटचा मारा करण्यात आला. तर, इस्त्रायलचे म्हणणे आहे की, उत्तरादाखल त्यांनी गाझामध्ये 150 ठिकाणी हल्ले केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव सौम्या संतोष आहे, जी मागील 7 वर्षापासून इस्त्रायलमध्ये रहात होती. हल्ल्याच्या वेळी सौम्या एका घरात ज्येष्ठ महिलेची देखभाल करत होती. या घटनेत ज्येष्ठ महिला बचावली आहे, मात्र सौम्याचा मृत्यू झाला. ज्येष्ठ महिलेला जखमी आवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रिपोर्टमध्ये इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संदर्भाने म्हटले आहे की, हमासकडून रहिवाशी भागात 130 रॉकेट सोडण्यात आली आहेत. सोबत या दरम्यान यरुशलममध्ये सुद्धा हिंसा पसरल्याचे म्हटले जात आहे. इस्त्रायलने मंगळवारी हल्ला वाढवत गाझापट्टीवर हल्ले केले. या दरम्यान एक मोठी इमारत उध्वस्त करण्यात आली, ज्यामध्ये दहशतवादी राहत होते. या दरम्यान 3 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता.

2014 पासून दोन्ही बाजूकडून घातक करवाई झाली आहे. सतत वाढणार्‍या या संघर्षामुळे अंतरराष्ट्रीय समुदाय सुद्धा चिंताग्रस्त आहे. अनेक देशांनी हिंसा थांबवण्याचे आवाहन केले आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, हमासने यरुशलमध्ये राकेट मारा करून मर्यादा ओलांडली आहे.

आणीबाणीची घोषणा
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जारी हिंसेदरम्यान पंतप्रधान नेतन्याहू यांनी लॉड शहरात आणीबाणीची घोषणा केली आहे.