दुष्काळग्रस्तांसाठी खुषखबर ! आकस्मित निधीत 2 हजार कोटी रुपयांची वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- महाराष्ट्रामध्ये यंदा १५१ तालुक्यांत दुष्काळ पडल्याने मंगळवारी राज्य मंत्रिडाळाच्या बैठकीत दुष्कांळग्रस्तांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले.राज्यतील दुष्काळग्रत लोकांच्या महाराष्ट्र अकस्मिकता निधीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात २ हजार कोटी रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य महत्वाचे निणर्य घेतले.

पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात ३४९ फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करण्यासाठी मुखमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पहिल्या टप्प्यात राज्यातील दुर्गम भागात ८० चिकित्सालय स्थापन करण्यात येणार आहेत. नागपुर व अमरावती या विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझल जमिनी फ्रि होल्ड ( भोगवटादार वर्ग – १ ) करण्यास मान्यता देण्यात आली.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना राबविण्यास राज्यात मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना अर्थसहाय्य करण्याच्या आकृतीबंधात 05:45:50 या प्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता.

सेवानिवृत्त तालुका निरिक्षक भूमी आभिलेख बाबुराव नानासाहेब आर्दड यांना लालचलुचपत प्रकरणी उच्च न्यायालयानेच दोषी ठरविल्याच्या त्यांचे संपूर्ण सेवानिवृत्तीवेतन काढुन घेण्यास मान्याता देण्यात आली आहे.

पुण्यातील स्पाईसर एडव्हान्टीस युनिव्हर्सिटी संदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.