Har Ghar Savarkar Committee | हर घर सावरकर समिती आणि राज्य सरकारकडून गणपती देखाव्याची स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना 15 लाखांचे बक्षीस

पोलीसनामा ऑनलाइन – Har Ghar Savarkar Committee | महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा जगभरात नावाजला जातो. सध्या सर्वत्र उत्सवाची तयारी जोरदार सुरु असून ठिकठिकाणी मंडप आणि देखाव्यांचे काम सुरु आहे. या गणेशोत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी केला जाणारा देखावा किंवा डेकोरेशन. या वर्षी हर घर सावरकर समिती आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य पातळीवर अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित गणपतीची आरसा अथवा देखावा करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यव्यापी या स्पर्धेमध्ये विजेत्यांना एकूण 15 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची तारीख 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर असणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. (Har Ghar Savarkar Committee)

हर घर सावरकर समिती आणि राज्य सरकार यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यभरातून लोक सहभागी होऊ शकतात. यासाठी गणपती बाप्पाची आरस ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित असणे गरजेचे आहे. देखाव्यामध्ये स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या सावरकरांच्या जीवनातील पैलूंवर आरास करायची आहे. (Har Ghar Savarkar Committee)

यामध्ये सावरकरांच्या जीवनातील प्रसंग, कार्य, शौर्य त्यांचे व्यक्तीमत्त्व तसेच साहित्य लेखन अशा अनेक बाबींवर आधारित
मूर्त रुपात व्यक्त करणारा देखावा तयार करावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये कौटुंबिक, सोसायटी, मित्रमंडळ,
शाळा किंवा सार्वजनिक मंडळे यापैकी कोणत्याही स्तरावर भाग घेऊ शकतो.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका भरणे गरजेचे आहे. यासाठी एक गूगल फॉर्म देण्यात येणार आहे.
या गूगल फॉर्मची लिंक आणि त्यांचा QR कोड हा 19 सप्टेंबरला हर घर सावरकर या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला जाणार आहे. (https://www.facebook.com/HarGharSavarkar/)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ