Harbhajan Singh | “ऐसे काम नहीं चलेगा…” हरभजन सिंगची केएल राहुलच्या फॉर्मवर प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन : Harbhajan Singh | सध्या ऑस्ट्रेलियात (Austrelia) सुरु असलेल्या T-20 वर्ल्डकपमध्ये (T-20 World Cup) टीम इंडियाला काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पराभव स्वीकारावा लागला. इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे हा पराभव झाला. तिसऱ्या मॅचमध्ये झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे खराब कामगिरी करणाऱ्या खेळडूंवर सोशल मीडियावरून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) के एल राहुलच्या (KL Rahul) फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले आहे.

कालच्या सामन्यात भारताचा उपकर्णधार आणि सलामीचा फलंदाज के. एल. राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्यावेळी त्याच्यावर चाहत्यांनी जोरदार टीका केली. आतापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचमध्ये त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादव (Suryakymar Yadav) हा एकमेव खेळाडू सोडला, तर इतर कोणत्याही खेळाडूला विशेष कामगिरी करता आलेली नाही. (Harbhajan Singh)

सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 133 पर्यंत पोहोचली.
ज्यावेळी टीम इंडियाच्या 50 धावा झाल्या होत्या, त्यावेळी टीम इंडियाचे पाच फलंदाज बाद झाले होते.
मागच्या तीन मॅचमध्ये केएल राहूलने चांगली फलंदाजी न केल्यामुळे त्याच्या जागेवर ऋषभ पंतचा विचार करावा असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे यापुढील सामन्यात के. एल. राहुलच्या जागी ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत ऋषभ पंतला विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना खेळता आलेला नाही.

Web Title :- Harbhajan Singh | harbhajan singh took a tough stand on kl rahuls form

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा