×
Homeताज्या बातम्याHardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग...

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (Union Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी चंद्रपुरमध्ये (Chandrapur) एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी चंद्रपुरात 20 टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी (Petroleum Refinery) स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर (Chandrapur Lok Sabha Constituency) लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरी (Hardeep Singh Puri) यांची पक्षाकडून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपच्या (BJP) वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हरदीपसिंग पुरी  यांनी पेट्रोलियम खात्याने 252 पासून 400 मिलियन मेट्रिक टन वार्षिक रिफायनिंग क्षमता
वाढविल्याची माहिती दिली. मागच्या सरकारने रत्नागिरी (Ratnagiri) येथील प्रकल्प रखडवले.
मात्र, आता 20 टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू असे आश्वासन पुरी यांच्याकडून देण्यात आले.

मागील लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) राजकीय स्थिती अनुकूल असतानादेखील भाजपने चंद्रपूरची जागा गमावली होती.
यामुळे भाजपच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री पुरी तीन दिवस चंद्रपूरच्या लोकसभा क्षेत्रात मुक्कामी आहेत.
राज्यात लोकसभेच्या भाजपने गमावलेल्या जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी पक्षाकडून लोकसभा प्रवास अभियान (Loksabha Pravas Abhiyan) सुरु करण्यात आले आहे.

Web Title :- Hardeep Singh Puri | a petroleum refinery will be established in chandrapur announcement by union petroleum minister hardeep singh puri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | गणेशखिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम 6 ऑक्टोबरपासून सुरू; चांदणी चौकातील उड्डाणपुल 2 ऑक्टोबरला पाडणार, 2 ऑक्टोबरला मुंबई- बंगळूर महामार्गावर ‘मेगाब्लॉक’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News