वयाच्या 40 व्या वर्षी अभिनेता हरमन बावेजानं केला साखरपुडा ! ‘या’ कारणामुळं झालं होतं ‘देसी गर्ल’ प्रियंकासोबत Breakup

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अॅक्टर हरमन बावेजा (Harman Baweja) यानं हेल्थ कोच साशा रामचंदानी (Sasha Ramchandani) सोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या रोका सेरेमनीचे फोटो हरमनची बहिण रोवेनानं हिनं सोशलवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिनं हरमनला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या खासगी आयुष्यामुळं हरमन कायमचं चर्चेत राहिला आहे. एक वेळ असा होता जेव्हा हरमन आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) नात्यात होते. प्रियंकाचं लग्न होण्यापूर्वी ती हरमन बावेजाला डेट करत होती. परंतु त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही आणि त्यांचं ब्रेकअप झालं. एका मुलाखतीत बोलताना हरमननं त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं होतं. 2008 साली प्रियंका आणि हरमन यांची मैत्री लव्ह स्टोरी 2050 च्या सेटवर झाली होती.

हरमन म्हणाला होता की, लव्ह स्टोरी 2050 आणि व्हिक्टरी हे सलग 2 सिनेमे फ्लॉप झाले होते. म्हणून एखाद्या सुपरहिट सिनेमासाठी मी प्रयत्न करत होतो. त्याचवेळी मला व्हॉट्स युअर राशी हा सिनेमा मिळाला. यासाठी मी सर्वस्व झोकून दिलं होतं. डायरेक्टर आशुतोष गोवारीकर यांनीही माझ्यावर खूप विश्वास दाखवला होता. हा विश्वास मला तोडायचा नव्हता. परिणामी मी प्रियंकाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. सिनेमावर अति लक्ष केंद्रीत केल्यानं आमच्या नात्यात दरी आली. मतभेद वाढले आणि आमचं ब्रेकअप झालं.

व्हॉट्स युअर राशी हा हरमनचा सिनेमाही फ्लॉप ठरला होता. सिनेमाची पटकथा वेगळी असूनही सिनेमा चालू शकला नाही. या सिनेमानंतर काही दिवसातच प्रियंका आणि हरमन यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यावेळी अशी चर्चा होती की, 3 सिनेमे फ्लॉप झाल्यानं प्रियंकानं हरमनला सोडलं. मुलाखतीत बोलताना या चर्चा म्हणजे अफवा आहेत असंही हरमननं स्पष्ट केलं होतं.