बुद्धी ‘तल्लख’ होण्यासाठी अजब ‘योगा ‘ विद्यार्थ्यांसह शिक्षकही काढणार ‘उठाबशा’ !

चंदीगड : वृत्तसंस्था – खोड्या काढल्या म्हणून शाळेत दिली जाणारी उठाबशा काढण्याची शिक्षा आता ‘ब्रेनयोगा’ या सदरात टाकण्याचा प्रकार हरियाणाच्या शिक्षण विभागाने केला आहे. बुद्धी तल्लख होण्यासाठी उठाबशा या खूपच फायदेशीर असल्याने विद्यार्थ्यांना त्या सक्तीच्या कारण्याबरोबरच शिक्षकवर्गानेही मुलांसमवेत दररोज उठाबशा काढण्याचे शिक्षण विभागाने सुचविले आहे. त्यामुळे या अजब योगाची चर्चा रंगली आहे.

नुकताच देशात योगदिन उत्साहात साजरा झाला नाही तोच हरियाणातील शिक्षण विभागाने उठाबशा काढल्याने मेंदू तल्लख होतो त्यामुळे मुलांना योगासनांऐवजी उठाबशा काढण्याचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर एका शाळेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुलांबरोबर शिक्षकांनाही १४ उठाबशा काढण्याचे अनिवार्य केले आहे. देशातील प्राचीन परंपरांना पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी उठाबशा काढण्याचा नियम करण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यासाठी या उठाबाशाना ‘ब्रेन’ योगा हे नावही दिले आहे.

घरच्या घरीच करा ‘थायरॉईडवर’ जालीम उपाय

‘या’ कारणामुळे सुजतात पाय

थकवा दूर करण्यासाठी ‘या’ मार्गांचा अवलंब करा

पाऊस नसल्याने बागलाण तालुक्यातील पेरण्यांना लगाम, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १८ टक्केच पेरण्या….

तथागत गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी