भारतीय युवतीशी झालं पाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाचं लग्न, कोहलीची ‘फॅन’ आहे बायको

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चँपियन्स ट्रॉफी, आशिया चषक आणि भारत विरुद्ध विश्वचषक अशा स्पर्धांमध्ये गोलंदाजीचा जलवा दाखविणारा पाकिस्तानी गोलंदाज हसन अली क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्याहूनही अधिक म्हणजे तो भारताचा जावई आहे. आज (2 जुलै) हसन अलीचा 26 वा वाढदिवस आहे. भारतीय मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या यादीत हसन अलीचाही समावेश आहे. शोएब मलिक यांच्याप्रमाणे हसन अली देखील भारताचा जावई आहे.

हसन अलीपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने 2010 साली भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केले होते. याशिवाय आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू मोहसिन खानने बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉयशी लग्न केले होते, दोघांनी नंतर घटस्फोट घेतला. हसन अलीने 20 ऑगस्ट 2019 रोजी हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील रहिवासी शमिया आरजूशी लग्न केले होते. हसन अली आणि भारतीय एयरोनॉटिकल इंजीनिअर शमिया आरजूचे दुबईमध्ये लग्न झाले होते, ज्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रच उपस्थित होते.

हसन अलीच्या म्हणण्यानुसार, शमिया आरजूसोबत त्याची पहिली भेट एका डिनर दरम्यान झाली होती. काही दिवसानंतर हसन अलीने शमियाला प्रपोज केले. हसन अलीची पत्नी शमिया आरजू मूळची हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील आहे. शमिया आरजूने एयरोनॉटिकल इंजीनिअरिंग केली आहे. शमिया आरजूचे कुटुंब दुबईत राहतात, तर तिच्या कुटुंबातील काही सदस्य दिल्लीत राहतात.

नुकताच हसन अलीची पत्नी शमिया आरजूने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत विराट कोहली हा तिचा आवडता फलंदाज असल्याचे सांगितले. पाकिस्तानकडून हसन अली आतापर्यंत 9 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 30 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. 2017 मध्ये पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात हसन अलीने शानदार कामगिरी केली होती.

नूंह जिल्ह्यातील चंदैनी गावातील रहिवासी शमिया आरजूचे वडील लियाकत अली हे बीडीपीओ पदावरून निवृत्त झाले आहेत. लियाकतचे आजोबा आणि पाकिस्तानचे माजी खासदार आणि पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सरदार तुफैल सख्खे होते. भारत आणि पाकिस्तानच्या वाटणीनंतर तुफैल पाकिस्तानात गेले, तर आजोबा भारतातच राहिले. माजी खासदार तुफैल यांचे कुटुंब पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील कच्ची कोठी नईयाकी येथे राहतात. त्याच्याद्वारेच शमियाचे हसनबरोबरचे लग्न ठरले.