अबब ! या गायीचे वजन तब्बल 1 टनापेक्षा जास्त, उंची ऐकून व्हाल हैराण

सिडनी : वृत्तसंस्था – एकीकडे भारतात गायीवरून राजकीय चर्चेला उधाण येताना दिसते परंतु ऑस्ट्रेलियामधील एक गाय सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या उंची आणि वजनामुळे ही गाय सध्या चांगलीच चर्चेत आहे. अक्षरश: ते पाहून लोक हैराण झाले आहेत. इतकेच नाही तर सोशल मीडियावर नेटीझन्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. याला कारणही तसेच आहे. साधारणपणे माणसाची उंची सहा फूटांपर्यंत असते. परंतु या गायीची उंची चक्क सहा फूटांपेक्षा जास्त आहे इतकेच नाही तर या गायीचे वजन चक्क एक टनापेक्षा जास्त आहे.

सोशल मीडियावर ही गाय सध्या चर्चेचा विषय आहे. ही ऑस्ट्रेलियातील असून या गायीचे वजन चक्क  १४०० किलो आहे. महत्त्वाचे म्हणजे या  धष्टपुष्ट गायीची उंची तब्बल सहा फूट चार इंच इतकी आहे. याशिवाय या गायीचे नाव Knickers असे आहे.  सात वर्षाच्या Knickers ची किंमत ३९६ ऑस्ट्रेलियन (२० हजार रूपये) डॉलर आहे. मुख्य म्हणजे गायीची उंची जास्त असल्यामुळे त्यांचे आयुर्मान वाढते असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त या आधी काही दिवसांपूर्वी इटलीमधील एक गाय अशीच चर्चेत होती.  Knickers गाय सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. सर्वजण तिला पाहून हैराण झाले आहेत.

‘सोशल मीडियावर व्हायरल होणारा Knickers चा फोटो एक वर्षभरापूर्वीचा आहे. Knickersला मी तीन वर्षाची असताना विकत घेतले होते. सध्या Knickersचे वय सात वर्ष आहे. उंची जास्त असल्यामुळे Knickersचे आयुष्य इतर गायीच्या तुलनेत आधिक असू शकते’ अशी माहिती गायीच्या मालकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली होती.