हवेली तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; कर्मचारी वर्गात घबराट

पुणे/लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा हा कोरोनाबाधित्यांच्या संख्येत आघाडीवर आहे. शहर आणि ग्रामीण भागात अनेक रुग्ण वाढताना दिसत असताच आता हवेली तहसील कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयात केवळ ३ अव्वल कारकून आणि २ महसूल सहाय्यक यांच्यावरच कार्यालयातील कामकाज चालू आहे. तेथील, कर्मचारी कोरोनाबाधित आढळून येत असून, त्यामधील एका शिपाईला कोरोनाची लागण झाली आहे. तो मागील १० दिवसांपासून अत्यवस्थ होता यामुळे, कर्मचाऱ्यांच्यात घबराट पसरली आहे. हवेली तहसील कार्यालयातील सतत वाढणारा कोरोनाबाधितांचा एकदा एक प्रशासनासाठी चिंताजनक आहे.

तहसील विभागामध्येच काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कार्यालयात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि महसूल सहाय्यक हे क्वारंटाईन आहेत. यामुळे पूर्ण तहसील कार्यालयाचा कामाचा भार हा ३ अव्वल कारकून आणि २ महसूल सहाय्यक यांच्यावर आलं आहे. आली आहे. मात्र, कार्यालयातील २ तहसीलदार कोरोनावर मत करून त्यांनी कामकाजही सुरू केल्याने प्रशासकीय कामांना प्रारंभ झाला. परंतु कोरोनामुळे कर्मचारी नसल्याने कामावर ताण येत आहे. तर अप्पर तहसीलदार विजयकुमार चौबे म्हणाले, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरू आहेत. कार्यालय पुर्णपणे सॅनिटाईझ केले आहे. बाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी आपली कोरोना टेस्ट करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच प्रशासनाने अभिलेख कक्ष बंद ठेवला आहे. येथे विनाकारण फिरणा-यांना मज्जाव केला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी कर्मचारी येण्यास धजवेनात. परंतु, वरिष्ठांच्या कार्यालयीन आदेशामुळे येथील कार्यविवरण मात्र कमी कर्मचा-यांच्या उपस्थितीत हळुवारपणे सुरूय. याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी येथील शिपाई आणि कर्मचा-यांना आठवड्यातील दिवस ठरवून देण्याविषयी सूचना केल्या गेल्या आहेत.