HDFC Bank Hike MCLR | ‘या’ खासगी बँकेचा कर्जदारांना झटका ! RBI च्या पतधोरणाआधीच कर्जदर वाढवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – HDFC Bank Hike MCLR | सर्वात मोठी असलेल्या रिझर्व्ह बँकेचे (RBI) पतधोरण जाहीर होण्याआधीच खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेकडून (HDFC Bank) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेकडून एमसीएलआर दर (HDFC Bank Hike MCLR) (कर्जदर) 0.35 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. 7 जून 2022 पासून नवीन कर्जदर (Debt Rate) लागू झाला असल्याचे एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आलंय. या दरवाढीने कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. तसेच, गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज आणि इतर नवीन कर्ज जादा दराने घ्यावे लागणार आहे. हे पाहता बँकेने कर्जदारांना एक झटका दिला आहे.

 

एचडीएफसी बँकेकडून वेबसाईटवर सुधारित व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार एका दिवसासाठी कर्जदर (एमसीएलआर) 7.50 टक्के, एका महिन्यासाठी 7.55 टक्के, 3 महिन्यांसाठी 7.60 टक्के, 6 महिन्यांसाठी 7.70 टक्के, 1 वर्षासाठी 7.85 टक्के राहील. 2 वर्षांसाठी 7.95 टक्के आणि 3 वर्षांहून अधिक कालावधीसाठीचा कर्जाचा दर 8.05 टक्के इतका वाढला आहे.

 

दरम्यान, महिनाभरात दुसऱ्यांदा एचडीएफसी बँकेने कर्जदर वाढवला आहे. याआधी 7 मे 2022 रोजी बँकेने एमसीएलआर दरात 0.25 टक्के वाढ केली होती. या दरवाढीने एचडीएफसी बँकेचे कर्ज आणि विद्यमान मासिक कर्जाचा हप्ता चांगलाच वाढला आहे. या दरम्यान, गृह वित्त पुरवठादार ‘एचडीएफसी’सह 3 बँकांनी गृहकर्जाचे सुधारित व्याजदर लागू केले होते. ‘एचडीएफसी’ने आज कर्जदरात (MCLR) 0.05 टक्क्याची वाढ केली होती.

या दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि
बँक ऑफ इंडियाकडून (Bank of India) देखील सुधारित कर्जदर लागू करण्यात आले होते.
तसेच, पीएनबी बँकेनं (PNB Bank) 1 जूनपासून कर्जदरात 0.15 टक्के वाढ केली होती.

 

Web Title :- HDFC Bank Hike MCLR | hdfc bank hike mclr on loan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार ! न्यायालयाच्या आवारातील खळबळजनक घटना

 

Maharashtra 12th Result 2022 | अखेर इयत्ता 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या

 

Mutual Funds SIP-Investment | म्युच्युअल फंड SIP ची जबरदस्त योजना ! 7 वर्षांत थोडीशी गुंतवणूक करा अन् मिळवा कमाल फायदा