मनपा उद्यान विभागप्रमुख निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – वृक्ष लागवडीच्या उपक्रमाच्या कामात कुचराई केल्याप्रकरणी महापालिका उद्यान विभागप्रमुख किसन गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आज ही कारवाई केली.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय वननीतीनुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे. राज्यात हे प्रमाण २० टक्के असल्याने यात लक्षणीय वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने येणा-या वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने उद्दिष्ट्य ठरवून दिलेले आहे. नगर महापालिकेसाठी ठरवून दिलेल्याउद्दिष्ट्यानुसार वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्याची जबाबदारी उद्यान विभाग प्रमुख किसन गोयल यांच्यावर सोपविण्यात आली होती.

सदर कामात त्यांनी कुचराई केली. वरिष्ठांनी वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा झाली नाही. त्यामुळे गोयल यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. सखोल चौकशीनंतर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी गोयल यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग