बटाट्याच्या सालीत अनेक गुण, ‘या’ 5 समस्यांना दूर ठेवण्यात लाभदायक

नवी दिल्ली : जगात सर्वात लोकप्रीय भाजी म्हटल्यावर कदाचित बटाट्याचे नाव नक्कीच घेतले जाईल. बटाट्यात अनेक चांगले गणुधर्म आहेत. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी6 आणि थियामिन सारख्या न्यूट्रिएंट्सचा बटाटा एक चांगला स्त्रोत आहे. परंतु, त्याची साल सर्वजण टाकून देतात. या सालीत सुद्धा असंख्य गुणधर्म असल्याने तिचा योग्य वापर केला पाहिजे. जर तुम्ही बटाट्याच्या सालीचे फायदे जाणून घेतले तर तुम्ही कधीही साल फेकून देणार नाही.

हे आहेत फायदे

1. ब्लड शुगर कंट्रोल –
सालीसह बटाटा खाल्ल्याने शरीराला एक्स्ट्रा फायबर मिळते ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

2. ब्लड प्रेशर रेग्युलेट –
बटाट्याच्या सालीत पोटॅशियम असल्याने सोडियमची मात्रा कमी होते. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल आणि रेग्युलेट करण्यात मदत होते.

3. अ‍ॅनिमियापासून सुरक्षा –
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास सालीसह बटाट्याचे सेवन केले पाहिजे. बटाट्याच्या सालीत आयर्न असते, ज्यामुळे लाल रक्तपेशींचे फंक्शन चांगले होते.

4. बद्धकोष्ठता –
बटाट्याच्या सालीत फायबर सुद्धा असते. ज्यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

5. स्किन आणि केस –
बटाट्याच्या सालीचा वापर केला तर डोळ्याखालील काळी वर्तुळं दूर होतील. स्किन ऑयली असेल, मुरूमे आणि ब्लॅकहेड्सची समस्या असेल तरी बटाट्याची साल उपयोगी आहे. बटाट्याची साल वाटून त्याचा ज्यूस स्कॅल्पमध्ये लावल्याने केसांची वाढ चांगली होते.