जीरं आणि गुळाच्या सेवनाने ’या’ 4 गंभीर समस्या राहतील दूर, जाणून घ्या फायदे

पोलिसनामा ऑनलाइन – आपल्या स्वयंपाक घरातच असे अनेक पदार्थ असतात, जे आपलं आरोग्य नेहमी चांगले ठेवू शकतात. मात्र, या पदार्थांचा वापर कशासाठी आणि कसा करायचा याबाबत माहिती असणे खुप आवश्यक आहे. असे अतिशय लाभदायक दोन पदार्थ म्हणजे जीरं आणि गुळ आहेत. हे दोन्ही पदार्थ स्वयंपाक घरात मोठ्याप्रमाणात वापरले जातात. मात्र, यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर करून तुम्ही आरोग्य चांगले ठेवू शकता. जिरं आणि गुळाचं पाणी कसं तयार करावं आणि त्याचे फायदे कोणते ते जाणून घेवूयात…

पाणी तयार करण्याची कृती
एका भांड्यात 2 कप पाणी घेऊन यामध्ये 2 ते 3 चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जिरे टाकून उकळवा. नंतर हे पाणी कोमट झाल्यावर प्या. हे पाणी सकाळी रिकाम्या घ्यावे.

हे आहेत फायदे

1 डोकेदुखी
कामाच्या ताणामुळे होणार्‍या डोकेदुखीवर गूळ आणि जिरेचे पाणी गुणकारी आहे.

2 श्वसन समस्या
सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार, अस्थमा, पचनाच्या समस्या, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर हे पाणी फायदेशीर आहे.

3 रक्ताची कमतरता
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हे पाणी प्यावे. यामुळे ब्लर्ड सर्क्यूलेशन सुद्धा चांगले होते.

4 रोगप्रतिकारकशक्ती
हे पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. खोकला, लिव्हरचे आजार होत नाहीत.