जाणून घ्या बहुगुणी जायफळाचे ‘हे’ 8 मोठे फायदे !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गोड पदार्थांना चव यावी आणि चांगला सुवास यावा यासाठी त्यात चिमुटभर जायफळाची पूड घातली जाते. पुरणाच्या पोळीतही याचा वापर केला जातो. फक्त गोड पदार्थांसाठीच याचा वापर केला जात नाही तर याचे अनेक फायदेही आहेत. जायफळाच्या सेवनानं शरीराच्या अनेक तक्रारी दूर होतात. अनेकांना याच्या फायद्यांबद्दल माहिती नाही. आज आपण याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

जायफळाचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) पचनक्रिया सुरळीत राहते.

2) आतड्यांच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.

3) कफविकारांमध्ये याचा खूप उपयोग होतो.

4) तोंडाची दुर्गंधी दूर होते.

5) भूक वाढण्यास मदत होते.

6) जुलाब तसेच पोटात मुरडा येणं या समस्यांवर गुणकारी आहे.

7) शांत झोप लागण्यास मदत होते.

8) गोडाचे पदार्थ चांगल्या प्रकारे पचण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.