जाणून घ्या केळफुल खाण्याचे ‘हे’ 6 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फळं म्हटलं की, त्याला बी आलीच. केळ हे एकमेव असं फळ आहे ज्यात बी नाहीये. बिन बीचं फळ म्हणून केळ ओळखलं जातं. केळीचे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

केळीप्रमाणेच त्याची फुले म्हणजेच केळफूल याचेही शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात. आज आपण केळफुल खाण्याच्या शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.

केळफुल खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) केळफुलाची भाजी म्हणजे एक सकस आहार आहे. लहान मुलांना याचा जास्त फायदा होतो.

2) गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात.

3) केळफुलामुळं हार्मोन्सचं प्रमाण संतुलित रहातं.

4) मासिक पाळीच्या काळात अति रक्तस्राव होत असेल तर केळफुलाची भाजी खावी. यामुळं फायदा मिळेल.

5) मासिक पाळीमधील वेदना दूर होतात.

6) रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.