Covid-19 Testing : आता मधमाशा सेकंदात वास घेऊन ओळखू शकतात कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जेव्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरु झाला. तेव्हा शास्त्रज्ञांनी वेगाने याचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. अशाचप्रकारे नेदरलँडमध्ये शास्त्रज्ञांनी कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे ओळखण्याचा मार्ग शोधून काढला. आता मधमाशांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे समजू शकते, असा दावा केला आहे.

मधमाशा फक्त वास घेऊन कोरोनाची लागण झाली की नाही हे ओळखू शकतात. जेव्हा कोणतीही कोरोनाबाधित व्यक्ती किंवा सँपल आणले जाईल. तेव्हा मधमाशा त्यांचे तोंड उघडेल. त्यातून हे समजेल की संबंधित सँपल कोरोनाबाधित आहे. तसेच हे शोधण्यासाठी जनावरांच्या क्षमतेची मदत घेतली जाऊ शकते.

असे दिले गेले मधमाशांना प्रशिक्षण

नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी मधमाशांना गंधापासून कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे समजण्यासाठी प्रशिक्षण दिले. अभ्यासातून, हे समजले की 150 पेक्षा जास्त मधमाशांचा समावेश केला होता. त्यासाठी शास्त्रज्ञांनी साखर आणि पाणी मिसळून वापरले. या मिश्रणातून मधमाशांना देऊन प्रशिक्षित केले गेले. त्यासाठी कोरोनाबाधित मिंकचा गंधाचा वापर करण्यात आला.

तसेच जेव्हा कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याच्या शरीरात तरल पदार्थाचा गंध संक्रमित न झालेल्या लोकांच्या तुलनेत थोडी बदलते. अशाप्रकारे मधमाशा काही सेकंदात कोरोनाचे सँपल ओळखू शकतील.