Health Department Recruitment | आरोग्य विभागात 11 हजार पदांची जम्बो भरती, उद्या निघणार जाहिरात; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Health Department Recruitment | गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागीतील भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात अनेक पदे रिक्त (Vacancies) आहेत. याचा परिणाम आरोग्य विभागावर होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) तातडीने आरोग्य विभागात 11 हजार पदांची मेगा भरती (Health Department Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागात भरण्यात येणाऱ्या पदांसाठी उद्याच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी दिली आहे. राज्याच्या शिक्षण खात्यानंतर (Education Department) आता आरोग्य विभागात मेगा भरती (Health Department Recruitment) होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नोकरीच्या मोठ्या संधी (Job Opportunities) उपलब्ध होणार आहेत.

आरोग्य विभागातील भरतीसाठी खरंतर मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येच (Maha Vikas Aghadi Government) जाहिरात निघाली होती. मात्र, या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द झाली होती. सरकारवरही अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता सध्याच्या महायुतीच्या सरकारवर भरतीसाठी दबाव वाढत होता. त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील पद भरली जाणार

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 11 हजार पदासाठी ही जाहिरात काढली जाणार आहे.
रिक्त जागा एमपीएससी (MPSC), राज्य निवड मंडळ (State Selection Board)
आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) यांच्यामार्फत भरल्या जाणार आहेत.
गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक,
टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश असेल. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई,
सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | महिला अत्याचारावर जलद कार्यवाहीसाठी 138 ‘फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट’, CM एकनाथ शिंदेंची माहिती