CM Eknath Shinde | महिला अत्याचारावर जलद कार्यवाहीसाठी 138 ‘फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट’, CM एकनाथ शिंदेंची माहिती

अहमदाबाद : वृत्तसंस्था – महिलांवरील अत्याचारांसंदर्भात राज्य शासन गंभीर असून लैंगिक गुन्हे (Sexual Offenses), महिला आणि मुलांवरील बलात्काराच्या प्रकरणांचा (Rape Case) तपास जलद गतीने सुरु आहे. लैंगिक गुन्ह्यांसाठी तपास ट्रॅकिंग सिस्टमच्या अनुपालन दरामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण सुमारे 46 टक्के आहे. बलात्कार आणि पॉस्को कायद्यातील (POSCO Act) खटल्यांवर जलद कारवाईसाठी 138 ‘फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट’ (Fast Track Special Court) स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोमवारी (दि.28) अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या 26 व्या बैठकीत (Western Regional Council) बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah), महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीत (Foreign Investment) देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जपानमधून महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

राज्यातील 5 जिल्ह्यातील पर्यटनाला चालना

नवीन बंदरे धोरण, माहिती तंत्रज्ञान धोरण, वस्त्रोद्योग धोरण आणि हरित हायड्रोजन धोरणाच्या
माध्यमातून महाराष्ट्राला आघाडीवर नेण्यात येत आहे. सीझेडएमपीची मान्यता मिळाल्यामुळे
राज्यातील पाच किनारी जिल्ह्यांमध्य पर्यटनाला चालना मिळेल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्य सरकार डहाणू ते सिंधुदुर्ग पर्यंत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी
कोस्टल रोड Coastal Road (किनारी मार्ग) तयार करीत आहे.
गोवा आणि गुजरात या राज्यांशी, जर हा मार्ग जोडला गेला, तर निश्चितच या राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले,
असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Bhavana Gawali | ‘पंतप्रधानांना राखी बांधली अन् ईडी थांबली’, उद्धव ठाकरेच्या टीकेला भावना गवळींचे प्रत्युत्तर म्हणाल्या-‘नातं टिकवता आलं नाही म्हणून…’