कोरोनातून रिकव्हरी झाल्यानंतर सुद्धा मधुमेहाच्या रूग्णांनी घरी ‘इतके’ दिवस लावावा मास्क, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनातून रिकव्हरीनंतर ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपासून बचाव सुद्धा आवश्यक आहे. देशातील अनेक राज्यांत ब्लॅक आणि व्हाईट फंगसला महामारी घोषित केले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये यलो फंगसचे प्रकरण सुद्धा नोंदले गेले आहे. तज्ज्ञांनुसार कोरोना संक्रमितांना फंगसचा जास्त धोका आहे. विशेषकरून मधुमेहाच्या रुग्णांना ब्लॅक फंगसचा जास्त धोका आहे. हा आजार मधुमेहात इम्यून सिस्टम कमजोर असणे, मोठ्या कालावधीपर्यंत व्हेंटिलेटरवर राहणे आणि वोरिकोनाजोल थेरेपीमुळे होतो. सोबतच अनियंत्रित शुगर आणि स्टेरॉईडचा जास्त वापरामुळे सुद्धा मधुमेहाच्या रूग्णांमध्ये ब्लॅक फंगस दिसून आला आहे.

यासाठी सरकारने अ‍ॅडव्हायजरी जारी करून लोकांना प्राथमिक लक्षणांमध्येच डॉक्टरांना संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. दुर्लक्ष केल्यास हा आजार धोकादायक ठरू शकतो. अनेक प्रकरणात डोळ्यांची सर्जरी करावी लागते. यासाठी तेलंगना वैद्यकीय शिक्षण महासंचालक डॉक्टर रमेश रेड्डी यांनी मधुमेहाच्या रूग्णांना कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा दोन महिन्यापर्यंत लागोपाठ घरात सुद्धा मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

त्यांनी म्हटले की, मधुमेहाच्या रुग्णांना ब्लॅक फंगसचा जास्त धोका आहे. याच्या बचावासाठी घरीसुद्धा मास्क लावा. ब्लॅक फंगस संसर्गजन्य आजार नाही. याचा त्या लोकांना जास्त धोका आहे, ज्यांची इम्युनिटी कमजोर असते. मेंदू आणि फुफ्फुसे संक्रमित होण्याच्या स्थितीत रूग्णांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. यासाठी प्राथमिक लक्षण जसे की चेहर्‍यावर वेदना, डोळ्यांच्या पापण्यांमध्ये सूज आणि कमी दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करा. सध्या आरोग्य मंत्रालयाने ब्लॅक फंगसच्या रूग्णांच्या उपचारासाठी औषधे आणि दोन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला आहे. तर, आयसीएमआरने मधुमेहाने पीडित कोरोना रुग्णांना स्टेरॉईडची मात्रा कमी करणे किंवा बंद करण्याचा सल्ला दिला आहे.