लॉकडाऊनमध्ये ‘या’ प्रकारच्या अन्नाचे सेवन केल्यास होईल फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असताना देखील देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केवळ सामाजिक अंतर आणि हात धुणे आवश्यक नाही, तर आपल्याला निरोगी आहार देखील घेणे आवश्यक आहे. या कालावधीत आपल्या जेवणात घरगुती प्रयोग करून पहा. त्यामुळे आपल्याला फायदा होईल. आपल्या आहारात रोग प्रतिकारशक्ती वाढेल अशा गोष्टींचा समावेश करा.

तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली स्वच्छता आणि स्वच्छते बाबतची काळजी घेणे आवश्यक आहे. ही एक रोग प्रतिकारक प्रणाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोना विषाणूचा संसर्ग अशक्त असलेल्या लोकांना लगेच होतो. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण निरोगी रहाल.

रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याचे उपाय
1. एक ग्लास गरम पाणी करून त्यामध्ये हळत, मिरपूड, लिंबाची साल आणि काळे मीठ घालून चांगले उकळा. हे पेय दिवसातून किमान 2 ते 3 वेळा प्या. हे पेय आपल्या रोग प्रतिकारक शक्तीस चालना देईल.
2. आहारात भाज्या, लिंबू प्रकारातील फळे, लसूण, कांदा, दही, ग्रीन टी, मध घ्या.
3. कोल्डड्रिंक, जंक फूड, अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू आणि ड्रग्जपासून दूर रहा.
4. दररोज 7-8 तास झोप घ्या.
5. तणाव, त्रास आणि नकारात्मक बातम्यांपासून आणि लोकांपासून दूर रहा.
6. मोकळेपणाने हसा, तणावापासून दूर राहण्यासाठी संगीत ऐका.
7. दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करून वजन कमी करा.
8. वारंवार हात धूत जा