Fat Free Foods for Weight Loss : वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर अशा प्रकारे बनवा आपले जेवण फॅट फ्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामुळे शरीरात अनेक आजार शिरकाव करतात. यासाठी जेवण बनवताना विशेष काळजी घेतली पाहिजे. जास्त तेल जेवणाची चव वाढवू शकते, पण आरोग्य देखील बिघडवू शकते. तेलाच्या जास्त वापरामुळे आहार जास्त कॅलरीचा समावेश होतो, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. जेवण बनवण्याच्या काही कृती अशा आहेत ज्यामध्ये कमी तेलाचा वापर करून आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो. जेवण बनवण्याच्या या पद्धती जाणून घेवूयात.

1. रोस्टेट फूडचे सेवन करा :
जेवण शिजवण्याऐवजी भाजी, मीट आणि बेक रोस्टेट करून शिजवा. रोस्टेट फूडमध्ये वसाची मात्रा कमी असते.

2. एयर फ्रायरमध्ये शिजवा :
एयर फ्रायरमध्ये जेवण शिजवले तर त्यामध्ये फॅट कमी असते. वजन नियंत्रित राहते.

3. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते:
कमी फॅटचे जेवण सेवन केल्याने लिपिड प्रोफाईल नियंत्रित राहते, ज्यामुळे शरीरात गुड कोलेस्ट्रोल योग्य राहते आणि बॅड कोलेस्ट्रोल कमी होते.

4. तंदूरमध्ये शिजवा :
डिप फ्रायच्या तुलनेत तंदूरवर जेवण शिजवल्यास फॅट कमी राहिल. याशिवाय एलडिहाईड, हेट्रोसायक्लिक अमिन आणि पोलीसायक्लिक एरोमॅटिक सारखी धोकादायक रसायने जी डिप फ्रायमुळे तयार होतात, ती तंदूरमध्ये होत नाहीत.

5. ग्रिल किंवा वाफेवर शिजवा :
जेवण भाजपण्यापेक्षा बेक, ग्रिल किंवा वाफेवर शिजवा. अशा जेवणात वसा कमी असल्याने वजन नियंत्रणात राहिल.

या तेलांचा करा वापर :
प्रयत्न करा की जेवणात सूर्यफुलाचे तेल, राईस तेल, आळशीचे तेल, तिळाचे तेल, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, खोबरेल तेलाचा वापर करा. ही सर्व तेल तुम्ही कमी प्रमाणात जेवणात वापरल्यास योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळण्यासह फॅटसुद्धा कमी होईल. ही तेल फॅटी अ‍ॅसिडयुक्त असतात जी आरोग्या चांगले ठेवतात.