Best Foods for Heart Health : कोरोना काळात हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ 5 सुपरफुडचा करा डाएटमध्ये समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोविड-19 संकटात एंग्जाएटी जगातील सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येकजण कोरोनामुळे भीतीच्या छायेत आहे. ज्यांना अगोदरच संसर्ग होऊन गेला आहे त्यांच्यासाठी हा काळ आणखी धोकायक ठरत आहे. अशा वातावरणात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे खुप आवश्यक आहे. यासाठी हृदयाचे आजार दूर ठेवणारे पाच सुपर फुड कोणते ते जाणून घेवूयात.

हिरव्या पालेभाज्या :

हिरव्या पालेभाज्या हृदयासाठी सुपरफुड आहेत. यामध्ये पालक सर्वात उपयोगी आहे. लेट्यूस, कोबी, फ्लॉवर, ब्रसेल्स स्प्राउट्स सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट आढळते. तसेच फायबर सुद्धा असते. ज्यामुळे शरीरात बॅड कॉलेस्ट्रोल तयार होत नाही. यात कॅलरी खुप कमी असतात.

नट्स :

अक्रोड, बदाम, हेजलनट्स, पीकेंस, पीनट्सचे सेवन करा. यात अनसॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि हृदय मजबूत करणारी अनेक पोषकतत्व असतात.

सॅलमन :

जगात जेवढ्या प्रकारचे मासे आहेत त्यापैकी सर्वात जास्त ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा स्त्रोत सॅलमन मासा आहे. याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. यानंतर टूना आणि सार्डिन माशांमध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते जे हार्टफेलची शक्यता खुप कमी करते.

बेरीज :

बेरीचे सेवन हृदयाच्या आजारासाठी खुप लाभदायक आहे. याच्या सेवनाने रक्ताची गुठळी होत नाही, हार्ट सुरळीत काम करते. यामध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट असते.

स्वीट पोटॅटो :

हृदयाच्या आजारापासून दूर राहण्यासाठी स्वीट पोटॅटो म्हणजेच बीट लाभदायक आहे. यामध्ये भरपूर पोषकतत्व असतात. एक कप बीटमध्ये 180 कॅलरी ऊर्जा, 4 ग्रॅम प्रोटीन, 6.6 ग्रॅम फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, नियासिन, कॉपर, पोटॅशियम, मँगनीज इत्यादी असते. याशिवाय यामध्ये केरेटोनॉएड सुद्धा आढळते. जे हृदयाच्या आजारांना शरीरापासून दूर ठेवते. यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीत राहते, ज्यामुळे हार्टचे आरोग्य चांगले राहते.