Health Insurance Cover | IRDA नं कंपन्यांना नवीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आणण्यास सांगितलं, घरात होणार्‍या उपचारांचा सुद्धा ‘विमा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Health Insurance Cover|Corona काळात उपचाराची पद्धत सुद्धा खुप बदलली आहे. बेड, ऑक्सीजन उपलब्ध नसल्याने लाखो लोकांना कोरोना महामारी (Corona Pandemic) मध्ये घरीच उपचार करावे लागले. ही गरज ओळखून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने Insurance companies ला नवीन प्रकारचे प्रॉडक्ट तयार करण्यास सांगितले आहे. जेणेकरून घरीच एखाद्या आजारावर उपचाराच्या प्रकरणात हेल्थ इन्शुरन्स कव्हर (Health Insurance Cover) मिळू शकते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

कोरोना काळात घरीच उपचाराच्या प्रकरणात इन्श्युरन्स कव्हरेजचे यश पाहता इरडाने नवीन पद्धतीने घरीच होणार्‍या उपाचारासाठी कंपन्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

अगोदर सुरू असलेल्या पॉलिसीत होऊ शकतो या सुविधेचा समावेश
इरडाकडून इंश्युरन्स कंपन्यांना पाठवण्यात आलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, कंपन्या आपल्या ग्राहकांकडून काही शुल्क घेऊन अगोदरपासून सुरू असलेल्या हेल्थ इन्शुरन्समध्ये या सुविधेचा समावेश करू शकतात. किंवा होम केयर ट्रीटमेंट कव्हरेजसह नवीन उत्पादन आणू शकतात.

होम ट्रीटमध्ये या सुविधा
इरडानुसार होम ट्रीटमेंट इन्शुरन्स अंतर्गत डॉक्टरच्या सल्ल्याने एखाद्या अशा आजाराचा उपचार जर घरी करण्यात आला, ज्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणे आवश्यक मानले जाते,
तर त्यास कव्हर केले जाईल. विडाल हेल्थचे संयुक्त व्यवस्थापन संचालक शंकर बाली नवीन यांनी म्हटले,
या प्रॉडक्टमध्ये ग्राहकांसह कंपन्यांना सुद्धा फायदा होईल.

नर्सच्या मदतीने होऊ शकतात उपचार
बाली म्हणाले, सर्जरीनंतरचे ड्रेसिंग किंवा फिजियोथेरेपीसारखे उपचार नवीन उत्पादनात सहभागी होऊ शकतात. घरच्या उपचारात खर्च कमी येत असल्याने कंपन्यांचे पैस सुद्धा वाचवतील.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Health Insurance Cover | irda asked companies to bring new insurance products home treatment will also be insured

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !