टॉयलेट करतेवेळी जळजळ होते का ? वेलची आणि लवंग करू शकते मदत

पोलिसनामा ऑनलाइन – लघवी किंवा टॉयलेट दरम्यान जळजळ होणे सामान्य समस्या आहे. परंतु जळजळ जास्त होत असेल तर हा चिंतेचा विषय होऊ शकतो. कारण यामुळे किडनीवर वाईट परिणाम होतो. या समस्येला डिस्यूरिया म्हणतात. यामध्ये जळजळीसह वेदनासुद्धा होऊ शकतात. मात्र, सुरूवातीला आहाराकडे लक्ष दिले तर ही समस्या नियंत्रित होऊ शकते. याशिवाय लवंग आणि वेलचीचे आयुर्वेदिक औषध वापरल्यास सुद्धा डिस्यूरियापासून आराम मिळू शकतो.

अशी घ्या काळजी
जळजळ जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जा. ही समस्या अवयवांची स्वच्छता न ठेल्याने सुद्धा होते. तसेच पाणी कमी प्यायल्यामुळे सुद्धा ही समस्या होत असल्याने भरपूर पाणी प्या.

लवंगचे तेल
लवंग तेल गरम पाण्यात मिसळून ते सेवन करा. हा उपाय दोन आठवडे करा. काही दिवसात लघवीची जळजळ बंद होईल. लवंगमुळे केसगळती थांबते, पोटाच्या समस्या दूर होतात.

वेलचीचा असा करा वापर
रोज दुधात वेलची पावडर टाकून प्यायल्याने डिस्यूरियाची समस्या बरी होऊ शकते. शिवाय वेलचीमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. वेलची किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. पोटात अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर वेलची टाकून थंड दूध प्यावे. यामुळे अ‍ॅसिडिटी दूर होते आणि पोटात थंडावा निर्माण होतो.