केसांची समस्या आणि वाढत्या वजनात प्रभावी सिद्ध होते ‘कोकम’, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – कोकम एक फळ आहे. ते मसाला म्हणून वापरले जाते. तर आयुर्वेदात ते औषध म्हणून वापरले जाते. दक्षिण आणि पश्चिम भारतात याचा अधिक वापर केला जातो. कोकमचा वापर गुजरात आणि महाराष्ट्रात करी मध्ये केला जातो. त्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे बर्‍याच रोगांमध्ये फायदेशीर असतात. विशेषत: केसांची समस्या आणि वाढते वजन कमी करण्यासाठी हे प्रभावी फळ आहे. जर तुम्हाला अकाली केस गळती आणि तुटण्याची काळजी आहे, तर तुम्ही आपल्या केसांवर कोकम फळ वापरू शकता. हे केवळ केसांना तुटण्यापासून आणि पिकण्यापासूनच रोखत नाही, तर केस दाट, लांब आणि काळे देखील करते. तुम्हाला या फळाविषयी माहिती नसेल, तर त्याचे फायदे जाणून घ्या…

केसांसाठी फायदेशीर
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोकम केसांची समस्या दूर करण्यास सक्षम आहे. यासाठी तुम्ही कोकमची पिकलेली फळं शॅम्पू म्हणून वापरू शकता. याचा उपयोग केल्याने केसांची समस्या दूर होऊ शकते आणि तुमचे केस रेशमी व चमकदार बनू शकतात.

वजन कमी करू शकते
कोकममध्ये hydrochloric acid आढळते, जे भूक रोखण्याचे काम करते. त्याचे सेवन केल्याने नेहमी पोट भरल्यासारखे वाटते. सोप्या भाषेत सांगायचे तर ते फायबरसारखे काम करते. कोकमच्या या गुणवत्तेमुळे वजन कमी करण्यात ते प्रभावी मानले जाते.

इम्यून सिस्टम मजबूत होते
कोरोना विषाणू महामारी काळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचा सल्ला देते. तसेच इतर रोग टाळण्यासाठी देखील आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकता. यासाठी कोकमचे सेवन करणे चांगले आहे. त्यात अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आढळतात.