आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला लाखमोलाचा सल्ला, म्हणाले – ‘कोणतेही दुखणं अंगावर काढू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज राज्यात 50 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. असे असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वसामान्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. कोणतंही दुखणं अंगावर काढू नका, असा सल्ला टोेपे यांनी दिला आहे. तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असून सर्वसामान्य जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, थोडी जरी लक्षण आढळली तरी चाचणी करा. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करावा. कोणत्याही परिस्थितीत अंगावर दुखण काढू नये असे ते म्हणाले. तसेच जिल्हाजिल्ह्यातील माझा आभ्यास हेच सांगतोय की उपचार घेण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावला आहे. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की दुखण आंगावर काढू नका त्वरित कार्यवाही करा असा मोलाचा सल्ला टोपे यांनी दिला आहे. दरम्यान कठोर निर्बंध लावूनही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामळे ठाकरे सरकार पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन करण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे संकेतही मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. यासंबंधी चर्चा करण्यासाठी आज मंगळवारी (दि. 20) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.