Stay Home Stay Empowered : ‘या’ 7 सात टिप्स कोरोनाशी लढण्यात उपयोगी पडू शकतात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोनाची दुसरी लाट खुपच वेगाने वाढत आहे. अशावेळी आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे ही प्रथमिकता आहे. आपल्याला शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी रहावे लागेल. न्यूयॉर्कच्या लेखिका ज्यूली विशर म्हणतात की जेव्हा आपल्या वाटत होते की, महामारी संपली आहे, तेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली. खरंतर हा आजार कधी गेलाच नव्हता. यासाठी आपल्याला महामारीशी पुन्हा लढण्यासाठी तयार व्हावे लागेल. हा धोका टाळण्यासाठी काही टीप्स जाणून घवूयात…

1. दिनचर्येचे पालन करा
दिवसासाठी योजना बनवा. यामुळे बाहेर कमी पडण्यास मदत होईल. नियंत्रित असल्याचे जाणवेल. फोकस्ड होऊन कामही करता येईल.

2. शारीरीदृष्ट्या सक्रिय रहा
घरात राहण्यासह शारीरीदृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे. यासाठी घरात व्यायाम करा. योगा करा, चाला.

3. पौष्टिक आहार
सध्या पौष्टिक आहार खुप महत्वाचा आहे. साखर-मीठ कमी करा. ताजी फळे-भाज्या खा. जेवणात वसा, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेटची योग्य मात्रा असावी.

4. मानसिक आणि भावनात्मक आरोग्य
बेचैनी, तणाव आणि जास्त डोकेदुखी वाटत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. दिर्घ श्वास घेणे आणि कुटुंबांशी सतत बोलण्याने बरे वाटेल. आवडीचे पदार्थ खा. नकारात्मक विचार टाळा.

5. प्रेरणा घ्या
लाईफ कोच अन्ना जियाननकोरस म्हणतात, या काळात प्रेरणा खुप महत्वाची आहे. सेलिब्रिटी, अ‍ॅथलीट, मित्र इत्यादींकडून शिका ते महामारीच्या काळात कसे फिट राहात आहेत. गाणी ऐका, पुस्तक वाचा आणि घराच्या बाहेर फिरा.

6. माहिती ठेवा पण जास्त नाही
बातम्या आणि माहितीवर लक्ष ठेवा. परंतु अति खळबळजनक माहितीपासून दूर रहा. तर वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. भविष्याबाबत जास्त चिंता करू नका.

7. चांगली झोप
निरोगी राहण्यासाठी योग्य झोप आवश्यक आहे. यासाठी झोपेच्या वेळेचे पालन करा. दिवसा व्यायाम केल्याने रात्री चांगली झोप येईल. झोपण्यापूर्वी एक तास अगोदर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करून दूर ठेवा.