Health tips | बाथरूममधील 5 वस्तू आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक, काळजी घेणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या दुष्परिणाम

नवी दिल्ली : Health tips | बाथरूममध्ये वापरल्या जाणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींवर दररोज लक्ष दिले पाहिजे. बाथरूममध्ये अशा काही गोष्टी असतात, ज्या वापरल्यानंतर दूर ठेवल्या पाहिजेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ते जाणून घेवूया. (Health tips)

 

या गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक

 

१. लुफा :

आंघोळ करताना लूफा वापरल्याने रक्ताभिसरण सुधारते. लूफा त्वचा स्वच्छ करताना स्क्रबच्या रूपात बॉडी मसाजचे काम करते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. पण लूफा जास्त काळ वापरू नये. अनेक वेळा ओलाव्यामुळे त्यात बॅक्टेरिया प्रवेश करतात, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. (Health tips)

 

२. साबण :

बाथरूममध्ये जर कोणती गोष्ट सर्वात जास्त वापरली जात असेल तर ती आहे साबण. साबण जास्त वेळ उघडा ठेवल्याने त्यामध्ये बॅक्टेरीया निर्माण होतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बाथरूममधील साबण लगेच काढून टाका. साबणाला क्रॅक गेल्यानंतर तो काढून टाकावा.

 

३. सनस्क्रीन :

जास्त काळ सनस्क्रीन वापरणे टाळा. बहुतेक लोक बाथरूममध्ये सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीनची एक्सपायरी तीन वर्षांनी संपते, पण अज्ञानामुळे लोक वापरतच राहतात. त्यामुळे हे क्रीम वापरण्यापूर्वी त्याची एक्सपायरी तपासा. असे केल्याने अ‍ॅलर्जी होऊ शकते.

 

४. क्रीम आणि लोशन :

क्रीम किंवा लोशनचा वापरही जास्त काळ करू नये. लोक हे बाथरूममध्ये ठेवतात.
या प्रकारची क्रीम किंवा लोशन ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ वापरू नये. ते फेकून द्यावे.
कारण स्किन केअरमधील निऑस्पोरिन सारख्या मेडिकेटेड हीलिंग लोशनमध्ये सक्रिय बॅक्टेरिया असतात, जे त्वचेवर वाईट परिणाम करतात.

५. रेझर ब्लेड :

लोक रेझर ब्लेड बाथरूममध्येच ठेवतात. सततच्या ओलाव्यामुळे ब्लेड गंजतात.
अशा ब्लेडने दाढी केल्याने संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच बाथरूममध्ये जास्त काळ ठेवलेले ब्लेड वापरणे टाळा.
बाथरूममध्ये ठेवले असेल तर ते बाहेर फेकून द्या.

 

Web Title :  Health tips | 5-things-kept-in-bathroom-can-be-dangerous-for-health-monitoring-is-very-important-know-their-side-effects

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा