Health Tips | सायंकाळी 6 वाजतानंतर खाऊ नये स्नॅक्स? जाणून घ्या कारण आणि एक्सपर्टचा सल्ला

नवी दिल्ली : Health Tips | स्नॅक्स खाण्यासंदर्भात एक नवीन गोष्ट समोर आली आहे. तज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही वेळी स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीरात अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यांच्या मते, लोकांनी स्नॅक्स खाण्याची वेळ ठरवावी, तसेच ठराविक वेळी स्नॅक्स खाणे टाळावे. (Health Tips)

 

शरीराला हानी पोहोचू नये म्हणून स्नॅक्स कोणत्या वेळी खाऊ नये, स्नॅक्स खाण्याबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया. (Health Tips)

 

तज्ञांनी काय सांगितले

तज्ञांच्या मते चुकीच्या वेळी स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यांच्या मते, संध्याकाळी आणि रात्री स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. मिररच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर सारा बेरी यांनी सांगितले की, संध्याकाळी सहानंतर आणि रात्री नऊनंतर स्नॅक्स खाऊ नये. या वेळी स्नॅक्स न खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

काही स्नॅक्समध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ आणि तेल असते आणि हे स्नॅक्स प्रोसेस्ड करून तयार केले जाते. प्रोसेस्ड फूडचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. लोकांनी ते टाळले पाहिजे, हे यापूर्वी अनेक अभ्यासांमध्ये स्पष्ट झाले आहे.

 

फूड क्रॅव्हिंगवर काय खावे

अनेकजण टाइमपास करण्यासाठी टीव्ही आणि मोबाईल बघताना स्नॅक्स खातात. अशावेळी, जर स्नॅक्सच्या वेळी फूड क्रॅव्हिंग असेल तर फक्त हेल्दी गोष्टीच खा. हेल्दी गोष्टींमध्ये फळे आणि भाज्या तसेच सॉल्टेड नट आणि थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाऊ शकता.

यामुळे आरोग्य चांगले राहते. तंदुरुस्त वाटते. एवढेच नाही तर फूड क्रॅव्हिंगची समस्याही दूर होते.

 

Web Title :  Health Tips | should-not-eat-snacks-after-6-pm-know-the-reason-advice-of-experts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा