थकवा येणे, हे असू शकते आजाराचे लक्षण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होणे, वजनदार सामान उचलताना दमछाक होणे, थोड जरी काम केले तरी दम लागणे, हे संकेत आजाराचे असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. शारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित आजार यांचा एकमेकांशी संबंध आहे. हृदयरोगाने पीडित थकवा लवकर जाणवतो. हृदयरोग असणारे काही लोक एकत्र करून अभ्यास केला असता संशोधकांना असे आढळून आले की, यापैकी ७० टक्के लोकांना नेहमी थकवा जाणवत होता. आर्टरीजमध्ये होणारा रक्तप्रवाह बाधित झाल्यामुळेही हा त्रास होतो.

शरीरात लोहाची कमतरता असल्यास व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. साधारणत: मासिक पाळी, गर्भावस्था आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलांना ही समस्या भेडसावते. अशा वेळी अ‍ॅनिमिक होण्याची शक्यताही असते. तसेच मधुमेह असलेल्यांच्या शरीरात ब्लड शुगरच्या अनियमिततेमुळेही थकवा जाणवू शकतो. ३० ते ४५ वर्षांच्या मध्यम वयाच्या महिला व पुरुषांना अनेक वेळा थायरॉइड ग्रंथींच्या सामान्यापेक्षा कमी सक्रियतेमुळेही अधिक थकवा जाणवू शकतो. या ग्रंथी गळ्यात असतात आणि टी ३ व टी ४ हार्मोन सक्रिय करतात. यामध्ये कमतरता आल्याने वजन वाढणे, खूप थंडी वाजणे, मलावरोध, त्वचा रुक्ष होणे आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवतात. हानिकारक व्हायरसमुळे लिव्हरला इजा होत असल्यास पीडित व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो. लिव्हरची कार्यप्रणाली असामान्य होणे किंवा एखादा संसर्ग झाल्यावरच ही स्थिती निर्माण होत असते.