’या’ 4 स्थितीत फुफ्फुसांचं होतं मोठं नुकसान, जाणून घ्या निरोगी राहण्याचे उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – फुफ्फुस हा आपल्या शरीरातील खुप महत्वाचा अवयव आहे. शरीराचे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर फुफ्फुसं निरोगी असणे खुप आवश्यक आहे. फुफ्फुसांत काही समस्या जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांकडे जावून तपासणी करणे आवश्यक आहे. कारण यात काही समस्या असेल तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. श्वसनाच्या समस्या निर्माण होतात. चुकीच्या जीवनशैलीचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. फुफ्फुसांच नुकसान कोणत्या कारणांमुळे होते जाणून घेवूयात…

ही आहेत ती कारणं

1 सीओपीडी
सीओपीडी म्हणजेच क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज हा अति धुम्रपानामुळे होतो. यामुळे फुफ्फुसांतीलमध्ये हवेच्या लहान लहान पिशव्या पूर्णपणे नष्ट होतात. श्वास घ्यायला त्रास होतो. यासाठी धुम्रपान सोडणे हाच उपाय आहे.

2 इन्फ्लुएंजा
इन्फ्लुएंजा व्हायरसमुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. यामुळे सर्दी, ताप, खोकला, श्वासाचा त्रास होतो. यासाठी गरम पाणी आणि काढ्याचे सेवन करावे.

3 छातीत गारवा
सर्दी, खोकला या समस्या सामान्य असल्या तरी यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होऊन छातीचा भाग आतून गार होतो. छातीमध्ये जास्त प्रमाणात गारवा तयार झाल्यास नुकसानकारक ठरते. यास ब्रोंकाइटिस असं म्हणतात. यासाठी गरम पदार्थ, आयुर्वेदिक चहा, आलं घातलेला चहा. हळदीचे दुध, गरम सुप यांचे सेवन करायला करावे.

4 अस्थमा
फुफ्फुसांमध्ये सुज आल्याने होणार्‍या अस्थमात श्वास घ्यायला त्रास, खोकला असा त्रास होतो. अशावेळी इन्हेलरचा वापर करावा. जास्त श्वास घ्यावा.